बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार

बाबरीचे पक्षकार अंसारी म्हणतात, पंतप्रधान मोदींनी अयोध्येचे रुपडे पालटले!

अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि बाबरी ढाचा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना बाबरी ढाचाकडून पक्षकार असणारे इक्बाल अंसारी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल वक्तव्य केले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यास आपण जाणार आहोत, असे इक्बाल अंसारी यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यांना निमंत्रणही देण्यात आले आहे. तसेच शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यात आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला. या रोडशोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुलांचा वर्षाव अंसारी यांनी केला होता. राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. त्या कार्यक्रमास ते गेलेही होते.

“राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले तर आपण हजर राहणार आहोत. अयोध्येत आता हिंदू- मुस्लिम वाद राहिलेला नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे, यासाठी अयोध्येचा नागरिक म्हणून मलाही अभिमान आहे. अयोध्येत आता कधीच हिंदू, मुस्लिम दंगे होणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि अयोध्येत मंदिर उभे राहिले. आमच्यासाठी हा विषय संपला आहे,” असे बाबरीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांना निमंत्रण देण्यात आले असून ते आता या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

आग्राची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!

मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!

‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय…’

इक्बाल अंसारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचा विकास चांगला झाला आहे. पूर्वी अयोध्येत लहान रेल्वे स्टेशन होते. आता तीन मजली भव्य स्टेशन झाले आहे. अयोध्येत विमानतळ नव्हते. आता विमानतळ उभारले गेले आहे. अयोध्येत सर्व बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा माझ्या घरासमोरुन गेला तेव्हा मी फुलांची उधळन करुन त्यांचे स्वागत केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version