अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

कोरोना व्हायरस सतत आपलं रुप बदलतोय आणि घातक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याचे नवे व्हेरियंट्स सातत्यानं समोर येत आहेत. आता याचा आणखी एक घातक व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. हा एवढा घातक आहे की, यामुळे अवघ्या सात दिवसांतच रुग्णाचं वजन कमी होतं. सर्वात आधी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळून आला होता. तिथूनच हा व्हेरियंट भारतात आल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, आता वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, ब्राझीलमधून कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट भारतात आले आहेत. दुसरे व्हेरियंटचं नाव बी.१.१.२८.२ आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैज्ञानिकांनी या व्हेरियंट्सचं परीक्षण एका उंदरावर केलं होतं. याचे अनेक धक्कादायक परिणाम समोर आले होते. वैज्ञानिकांनी केलेल्या परीक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, बाधित झाल्यानंतर लगेचच सात दिवसांच्या आत याची ओळख पटवली जाऊ शकते. हे एवढं घातक आहे की, या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीराचं वजन ७ दिवसांच्या आत कमी होतं. त्याचसोबत डेल्टा व्हेरियंटप्रमाणे हे देखील अँटिबॉडीची क्षमता कमी करु शकतं.

पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही)च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.१.१.२८.२ व्हेरियंट विदेशातून आलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला होता. या व्हेरियंटच्या जीनोम सीक्वेसिंग करण्यात आलं आहे, त्यानंतर परीक्षण करण्यात आलं. सध्या भारतात या व्हेरियंटचे फारसे रुग्ण नाहीत.

हे ही वाचा:

पुण्यात हे असतील अनलॉकचे नियम

६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

चीनचा प्रश्न सोडवायला नरेंद्र मोदी सक्षम

भारताची लसीकरणात इतर देशांच्या तुलनेने भरारीच!

विदेशातून परतलेल्या दोन व्यक्तींच्या सॅम्पल्सची सिक्वेसिंग करण्यात आली होती. कोरोनातून रिकव्हर होईपर्यंत दोन्ही व्यक्तींमध्ये याची लक्षणं नव्हती. परंतु, यांच्या सॅम्पल्सचं सीक्वेसिंग केल्यानंतर बी.१.१.२८.२ व्हेरियंटची माहिती मिळाली. त्यानंतर एका उंदरावर या व्हेरियंटचं परीक्षण करण्यात आलं. यामध्ये तीन उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतमध्ये संसर्ग वाढल्यामुळे झाला होता.

Exit mobile version