पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, ३० डिसेंबर रोजी विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचेही उद्घाटन केले आहे. यानंतर नरेंद्र मोदी सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रालाही एक वंदे भारत गाडी मिळाली आहे. जालाना ते मुंबई अशी ही गाडी धावणार आहे.
देशातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगवान आणि सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेने वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. या गाड्यांना नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. अशातच महाराष्ट्राला आता सातवी वंदे भारत गाडी मिळाली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून वेगवेगळ्या शहरांदरम्यानच्या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
आठ डब्यांची वंदे भारत विशेष ट्रेन (०२७०५) जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (वन-वे) जालन्याहून ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रवाना होईल. जालन्याहून रवाना झालेली ही गाडी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी औरंगाबादला पोहोचणार असून ११ वाजून ५७ मिनिटांनी प्रस्थान करेल. त्यानंतर ट्रेन मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबत सीएसएमटी मुंबई येथे संध्याकाळी ६.४५ वाजता पोहोचेल.
हे ही वाचा:
अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!
ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही
लल्लन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीश कुमारांची नियुक्ती!
भारतीयांची फाशी रद्द होणे म्हणजे भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय
जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी माता वैष्णोदेवी कटरा- नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर- दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर- बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, मंगळुरू- मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस, अयोध्या धाम- आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.