‘चांद्रयान – ३’ च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह जगभरातील नागरिकांचे लक्ष होते. या मोहिमेचं इस्त्रोने यू ट्यूबवरुन लाईव्ह प्रेक्षपण केले होते.सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. ‘चांद्रयान ३’ चे लाईव्ह प्रेक्षपण असल्याने जास्त लोकांनी पाहिल्याचा सुद्धा रेकॉर्ड झाला आहे.
‘चांद्रयान ३’ च्या लँडिंगचे दृश्य ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी यू ट्यूबवरुन पाहिले. याची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे.इस्त्रोच्या यू ट्यूबने स्पेनच्या इबाई ( Ibai) चा विक्रम मोडीत काढला आहे.Ibai च्या यू ट्यूबला ३४ लाख लोकांना एकाच वेळी पाहिले होते. हा विक्रम मोडीत निघाला आहे. चांद्रयान ३ चं यशस्वी लँडिंग झाल्यामुळे या मोहिमेला आतापर्यंत २४ लाख लाईक्स मिळाले असून तब्बल २२,२५९ जनतेने यू ट्यूबवर टिप्पणी केली आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याचे इस्रोने ट्विट केले.इस्रोचा हा मेसेज २ कोटी लोकांनी बघितला असून ६० लाख लोकांनी लाइक केले असून ५९ हजार लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे ही वाचा:
वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत दिल्लीतील जामा मशिदीला नोटीस
भारत चंद्रावर आहे; चांद्रयान- ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुख सोमनाथन यांचे गौरवोद्गार
कांद्याचा प्रश्न मिटला, लासलगाव, सोलापूरमध्ये लिलाव सुरू
मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’
‘चांद्रयान-३’ ने १४ जुलै २०२३ पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-३ पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चांद्रयान-३ ला ४० दिवस लागले आहेत.