पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पुन्हा ‘करोडपती’

यूट्यूबवर सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेले जगातील पहिले नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पुन्हा ‘करोडपती’

लोकप्रियतेच्या बाबतीत जगात अव्वल असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आणखी एक नवा विक्रम केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने तब्बल २ कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा पार केला आहे.विशेष म्हणजे २ कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा पार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले राजकीय नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक नेते आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत पंतप्रधान मोदींनी पहिले स्थान पटकावले आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे.हे रेटिंग २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

जय श्री राम: विशेष ट्रेनने अयोध्येतून येणार राम भक्त, उत्तराखंडमधील १५०० भाविक सर्वात पहिला घेणार रामलल्लाचे दर्शन!

आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!

मुंबई २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत

राजोरी-पुंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी

या रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर दुसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्राडोर हे आहेत.ओब्राडोर यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे.तर तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट आहेत.त्या खालोखाल ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा,ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आठव्या स्थानावर आहेत, त्यांना ३७ टक्के रेटिंग मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने २० मिलियन म्हणजे २ कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा पार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युट्यूब चॅनेलवर आतापर्यंत तब्बल २३ हजार व्हीडीओ अपलोड आहेत.तसेच पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवर ९४ मिलियन म्हणजेच ९ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर ८२.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. यासह पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर ४८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.दरम्यान, युट्यूबवर सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेल्या राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रथम क्रमांक लागला आहे.

 

Exit mobile version