पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेस (TMC) नेते शिबाप्रसाद हाजरा उर्फ शिबू हाजरा यांच्याविरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) पुढाकाराने संदेशाखाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पीडित महिला संदेशाखाली येथील एका गावातील रहिवासी आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या पीडित महिलेच्या घरी गेल्यानंतर पीडित महिलेने टीएमसी त्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली.पोलिसांनी कलम ३७६ (बलात्काराशी संबंधित) यासह भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची
लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!
बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
दरम्यान, संदेशाखाली येथील एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप करत १७ फेब्रुवारी रोजी टीएमसी त्याविरोधात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे श्चिम बंगाल पोलिसांनी हाजरा यांना अटक केली होती.शिबाप्रसाद हाजरा उर्फ शिबू हाजरा हा फरार असलेला तृणमूल काँग्रेस नेता शाहजहान शेखचा जवळचा सहकारी आहे.शाहजहान शेखचा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.