आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यामध्ये पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मेट्रोचे साहित्य बंगल्यासमोर ठेवल्याने मनोरमा संतप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. आता याचा व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण २०२२ मधील आहे. पुण्यातील बाणेर येथे मेट्रोचे काम सुरु होते. या कामासाठी लागण्यात येणारे साहित्य रस्त्याच्या कडेला सरकारी जागेवर ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी खेडकर कुटुंबीयांचा ‘ओम द्वीप’ नावाचा बंगला आहे. मेट्रोचे साहित्य ठेवल्यावरून मनोरमा खेडकर यांनी आक्षेप घेत मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी वाद सुरु केला. वाढता वाद पाहून मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मनोरमा खेडकर या पोलिसांशी हुज्जत घातली. व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !
लोकसभेत पराभूत खासदारांचा अजूनही सरकारी बंगल्यात ठिय्या, बजावली नोटीस !
३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ !
कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…
दरम्यान, यापूर्वी मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्या एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावताना दिसत होत्या. या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोरमा खेडकर आणि पती दिलीप खेडकर सध्या फरार आहेत. फरार खेडकर कुटुंबाच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरु आहे.