पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा

पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा

रौप्य पदक निश्चित

भारतीय पॅराएथलिट्सने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. नुकताच भारताने बॅडमिंटनमध्ये एक पदक निश्चित केलं. भारताचं हे दुसरं पदक आहे. प्रमोद भगतनंतर आता भारातचे सुहास यथिराज यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता रौैप्य पदक निश्चित झालं असून सुवर्ण पदकाची आशाही निर्माण झाली आहे.

सुहास यथिराज हे पॅराएथलीट असण्यासोबतच नोएडाचे डीएमदेखील आहेत. त्यांनी पुरुषांच्या एसएल४ कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय मिळवत पुढील फेरी गाठली. सुहास यांनी इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट  २१-९ तर दुसरा सेट २१-१५ ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण या पदकाला सुवर्णपदकात बदलण्याची सुवर्णसंधी सुहास यांना रविवारी असेल.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण

अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चेत

भारताचा अजून एक पॅरा बॅडमिंटनपटू तरूण ढिल्लन सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याच फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न तुटलं. त्याला लुकास मजूरने तीन सेट्स चाललेल्या सामन्यात मात दिली.  तरूण ढिल्लनने हा सामना १६-२१, २१-१६, १८-२१ अशा तीन सेट्ममध्ये गमावला. या पराभवामुळे त्याची रौप्य पदकासह, सुवर्णपदकाची आशा संपली आहे. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या कांस्य पदकाची आशा अजूनही कायम असून तो यासाठी सामना खेळणार आहे.

Exit mobile version