टोकियोमध्ये सध्या सुरु असलेल्या २०२० पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारताच्या हरविंदर सिंहने इतिहास रचला आहे. हरविंदर सिंहने टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत पुरुष एकलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे.
Outstanding performance by @ArcherHarvinder. He displayed great skill and determination, resulting in his medal victory. Congratulations to him for winning a historic Bronze medal. Proud of him. Wishing him the very best for the times ahead. #Paralympics #Praise4Para pic.twitter.com/qiwgMfitVz
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2021
पॅरालिम्पिक स्पर्धेत धनुर्विद्येतील हे भारताचे पहिले पदक आहे. हरविंदर सिंहच्या या पदकासह टोकियोमधील भारताच्या खात्यातील पदकांची संख्या १३ झाली आहे. आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात यंदा भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे.
हरविंदरने कोरियाच्या किम मिन सू ला हरवत टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पुरुष व्यक्तिगत स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. हरविंदरने कोरियाच्या शूटरलाा शूट ऑफमध्ये ६-५ ने मागे टाकत पदक आपल्या नावावर केले आहे. हरविंदरने जर्मनीच्या मॅक स्जार्सजेव्स्कीला ६-२ ने हरवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. त्यानंतर फायनलच्या शूटऑफमध्ये यशस्वी कामगिरी केली.
हे ही वाचा:
रिलायन्स उद्योगाला लाभली नवी ऊर्जा
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत निवडणुका नकोत
अनिल देशमुखांना भगौडा घोषित करा, संपत्ती जप्त करा
अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरविंदर सिंहला शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करत म्हणाले, हरविंदरने स्पर्धेत पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो. हरविंदरला त्याच्या या कामगिरीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.