छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे.चकमकीनंतर पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस ठाणे परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेसलपाड आणि आसपासच्या जंगलात माओवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाली होती.गुप्त माहितीच्या आधारे डीआरजी ( जिल्हा राखीव रक्षक), बस्तर फायटर आणि केंद्रीय राखीव दलाचे कोब्रा बटालियन गस्तीवर पाठवण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, डीआरजी, बस्तर फायटर आणि सीआरपीएफचे कोब्रा बटालियनचे संयुक्त पथक आज (२९ एप्रिल) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास परिसरात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानकपणे पथकावर गोळीबार सुरु केला.
हे ही वाचा:
दादरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त
काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलेल्या अमित शाह यांच्या एडिटेड व्हिडीओविरोधात गुन्हा दाखल
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक!
‘औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं’
सुरक्षा दलांकडून देखील नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले.काही वेळ गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी पळून गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले.त्यानंतर सुरक्षा दलाने घटनास्थळाची झडती घेतली असता येथे एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आणि शस्त्रे सापडली.मारल्या गेलेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती, यामध्ये १० नक्षलवादी ठार झाले होते.ते पुढे म्हणाले की, या वर्षी आतापर्यंत बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ८१ नक्षलवादी ठार झाले आहेत.