पश्चिम बंगालमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

स्थानिकांचा उद्रेक, पोलीस चौकी जाळली

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात शनिवारी एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह एका पाणथळ जमिनीत सापडल्याची घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी तेथील पोलिस चौकीवर हल्ला करून जाळपोळ केली.
शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई केली नाही, असा त्यांचा आरोप आहे.

जयनगर परिसरात आज पहाटे तरुणीचा मृतदेह स्थानिकांना सापडताच जमावाने पोलिस चौकी जाळली आणि पोलिसांवरसुद्धा दगडफेक केली. त्यांनी चौकीच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलिसांना परिसर सोडण्यास भाग पाडले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा..

छत्रपती शिवरायांच्या विचारांचे चिन्ह म्हणजे संविधान

हिंदू नावांचे आधार कार्ड वापरून दसना देवी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम तरुणांना अटक

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जैश ए मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित तीन जण ताब्यात

या भागात मोठा पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला आणि एसडीपीओ आणि इतर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मुलीच्या कुटुंबीयांनी परिसरातील माहिसमारी चौकीत एफआयआर दाखल केला. परंतु, पोलिसांनी तक्रारीवर त्वरित कारवाई केली नाही, असा दावा एका स्थानिकाने केला.

आरजी कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद दिला, असे आणखी एका गावकऱ्याने सांगितले. आमच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमागील सर्व आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. ज्यांनी तक्रारीला उशिरा प्रतिसाद दिला, त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली असती तर मुलीला वाचवता आले असते, असे गणेश डोलुई या स्थानिकाने सांगितले.

तथापि, पोलिसांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली आणि मुलीच्या कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री ९ वाजता एफआयआर दाखल केल्यानंतर, पोलिसांनी कारवाई केली आणि प्राथमिक तपासानंतर आज सकाळी एका आरोपीला अटक केली. तपास सुरू असून आम्ही मृताच्या कुटुंबासोबत आहोत.

 

Exit mobile version