कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर जाधव यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र पाठवले आहे.
हेही वाचा..
इम्रान खानच्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर
भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!
सिगारेट न दिल्याने तरुणाचा खून, तीन आरोपी ताब्यात!
“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”
गेल्या ३०-३५ वर्षांपासून आपण शिवसैनिक म्हणून काम केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन काम केले. १९ वर्षे जिल्हाप्रमुख, ३ वर्षे तालुकाप्रमुख आणि ५ वर्षे हुपरी तालुका प्रमुख निष्ठेने काम केले. मात्र ४ जानेवारी रोजी पक्षाने माझ्याबद्दल जो निर्णय घेतला त्यानंतर आपण व्यथित झालो आहोत. इतकी वर्षे शिवसेना तळागाळात पोहोचवण्याचे काम केले. अनेक आंदोलने केली. गुन्हे अंगावर घेतले. पक्षासाठी इतके करून सुद्धा ज्या पद्धतीने ज्या लोकांच्या सांगण्यावरून हा निर्णय झाला त्यामुळे माझ्यासह अनेक शिवसैनिक व्यथित झाले आहेत. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.