पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!

पटियाला मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी पटियालाच्या खासदार प्रनीत कौर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती.अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. पंजाबमधील ‘रॉयल ​​सीट’ पटियाला येथून त्या चार वेळा काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. प्रनीत कौर यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की, ‘मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मी गेली २५ वर्षे लोकशाहीसाठी काम केले आहे. आज ती वेळ आली आहे, ज्याने आपल्या मुलांचे भविष्य चांगले बनवू शकतो.

हे ही वाचा:

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

त्या पुढे म्हणाल्या की, ‘मोदीजींचे कार्य, धोरणे आणि विकिसाच्या मार्गावर चालत असलेल्या भारताकडे पाहून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे.मोदीजींच्या नेतृत्वाखालीच आपण आपली मुले आणि देश सुरक्षित ठेवू शकतो. मी पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा आणि भाजपचे आभार मानते.

दरम्यान, असे मानले जात आहे की, पटियाला मतदारसंघातून भाजप त्यांना लोकसभा निवडणुकीत उभे करू शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आपला मुलगा मुलगा रणिंदर सिंग आणि मुलगी जयंदर कौर यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मुलगी जयंदर कौर यांनी यांनी यापूर्वी सांगितले होते की, तिची आई प्रनीत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल.अखेर प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. परंतु, भाजप त्यांना लोकसभेसाठी तिकीट देणार की नाही ते पाहावे लागेल.

Exit mobile version