विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!

भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंद्र सिंग याने देखील काँग्रेसला राम-राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विजेंद्र सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला.विजेंद्रला बॉक्सिंगमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बॉक्सर विजेंद्र सिंग यांचा भाजपात प्रवेश झाल्यावर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या येण्याने पक्षाला आणखी बळ मिळेल आणि ध्येयाकडे वाटचाल होईल.

विजेंद्र सिंह यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, ‘सर्वांना राम-राम. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एका प्रकारे मी घरी परतत आहे. देश-विदेशात खेळाडूंचा मान आणि सन्मान वाढला आहे. आता आपण परदेशातही सहज प्रवास करू शकतो. भाजपचे सरकार आल्यापासून खेळाडूंचे काम सोपे झाले आहे.मी पूर्वीसारखाच विजेंद्र आहे. जे चुकीचे वाटेल ते मी चुकीचे म्हणेन आणि जे योग्य वाटेल ते बरोबर म्हणेन, असे विजेंद्र सिंह म्हणाले.

हे ही वाचा:

अतिशी मार्लेना यांना भाजपकडून नोटीस

‘संजय सिंह यांना जामीन दिल्याने तपासावर विपरित परिणाम नाही’

फारुख अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सविरोधात गुलाम नबींनी थोपटले दंड

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

दरम्यान, विजेंदर हा मूळचा हरियाणा जिल्ह्यातील भिवानी येथील रहिवासी असून जाट समाजाचा आहे.विजेंद्र यांची राजकीय कारकीर्द फार मोठी नाही.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विजेंदर सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला होता. दक्षिण दिल्लीतून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या रमेश बिधुरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. बिधुरी यांना ६ लाख ८७ हजारांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पार्टीचे राघव चढ्ढा यांना ३ लाख १९ हजारांहून अधिक तर विजेंदरला १ लाख ६४ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

Exit mobile version