देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.मेरे प्यारे परिवारजन… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सर्व योजना आणि त्यांच्या यशाचा उल्लेख करत ‘विश्वकर्मा योजना’ या नवीन योजनेची घोषणा त्यांनी केली.
देशाच्या ७७ वा स्वातंत्र्यदिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे.मंगळवारी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकवला.यानंतर मेरे प्यारे परिवारजन… म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मागील वर्षांच्या कार्यकाळात गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सर्व योजनांचा आवर्जून उल्लेख केला. यासोबतच पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आज एका नव्या योजनेची घोषणाही केली. येणाऱ्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त ‘विश्वकर्मा योजना’ सुरु करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी १३-१५ हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली जाणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज
मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांनी बदलला डीपी, पण गमावले गोल्डन टिक
महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक
काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा
या योजनेमध्ये सोनार, लोहार, केशकर्तनकार आणि चर्मकार या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरकार मदत करेल, पंतप्रधान म्हणाले. या योजनेत १५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे मोदी म्हणाले.तसेच आपल्या मागील काळात चालू केलेल्या योजनांचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आम्ही ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पीएम मोदी म्हणाले की, मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी २० लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायानं १-२ लोकांना रोजगार दिला आहे.