सिडकोकडून दिवाळी भेट, ७ हजार ८४९ घरांच्या लॉटरीची घोषणा

सिडकोकडून दिवाळी भेट, ७ हजार ८४९ घरांच्या लॉटरीची घोषणा

नवी मुंबईत हक्काचं घर असायला हवं अशी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोने (CIDCO) सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. सिडकोने ७ हजार ८४९ परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची घोषणा केली आहे. दिवाळीचे औचित्य साधत सिडकोच्यावतीने घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून सामान्यांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

सिडकोने लॉटरी जाहीर केलेली ७ हजार ८४९ ही घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळ आहेत. सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनादेखील होणार आहे. उद्यापासून या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी करता येणार आहे.

सिडकोने लॉटरी जाहीर केलेली ७ हजार ८४९ घरे ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए २ बी आणि पी ३, बामणडोंगरी, नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहेत.

हे ही वाचा:

“जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य”

… आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात येत असलेली गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालय आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.

Exit mobile version