मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्यावरून देशभरात गोंधळ सुरू आहे. या वादावरून नागपूरमध्ये काल हिंसाचार घडला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये औरंगजेबाची कबर फोडणाऱ्या व्यक्तीला ५ बिघा जमीन आणि ११ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
नागपूर घटनेच्या विरोधात मंगळवारी (१८ मार्च) दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मुझफ्फरनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शेन करण्यात आली. निदर्शनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेब मुर्दाबाद’ आणि ‘भारत माता जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आणि औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना बुटांनी मारले पाहिजे असे म्हटले.
हे ही वाचा :
‘उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींपुढे लोटांगण घालून आले, नंतर पलटी मारली!’
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
अमेरिकेच्या DOGE प्रमाणेच मोदींच्या मॉडेलमुळे भारताचे वाचले पाच लाख कोटी
नागपूर हिंसाचार: दंगेखोरांना आठवणार पाकिस्तानी अब्बा !
निषेधादरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये मुघल शासक औरंगजेबासह सर्व परदेशी मुघल शासकांच्या कबरी आणि त्यांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची आणि स्मारकांची नावे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बिट्टू शिखेडा यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, जो कोणी औरंगजेबाची कबर फोडेल त्याला ५ बिघा जमीन (३ एकर) आणि ११ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. यासोबतच, नागपूर घटनेतील सर्व दोषी आणि औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्या सर्व जिहादींचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा आणि त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठवावे अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांकडे केली.