अभिनेत्री नयनताराचा ‘अन्नपूर्णी’ १ डिसेंबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. २९ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.परंतु धार्मिक भावना दुखावल्याबद्दल चित्रपटाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.त्यानंतर आता ‘अन्नपूर्णी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आला आहे.
नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी या चित्रपटाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे. या चित्रपटात प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह डायलॉग आहे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप अनेकांनी या चित्रपटावर केला. त्यानंतर आता नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी हा चित्रपट थेट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!
राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!
अन्नपूर्णी या चित्रपटामध्ये ‘राम मांसाहारी होता’ असा संवाद घेण्यात आला.यामुळे अनेकांनी चित्रपटावर टीका केली.अन्नपूर्णी चित्रपटाच्या विरोधात मुंबई आणि जबलपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जबलपूरमधील एका हिंदू संघटनेने चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, ज्यात भगवान श्री राम यांच्या विरोधात अयोग्य टिप्पणी करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप काही लोकांनी केला.
यानंतर अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर ट्वीट करुन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती.अखेर नेटफ्लिक्सनं हा चित्रपट त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवून टाकला आहे.