जोपर्यंत द्रमुक सरकार पाडले जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी घेतली शपथ 

जोपर्यंत द्रमुक सरकार पाडले जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!

चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (२६ डिसेंबर) या घटनेचा निषेध करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि उपाध्यक्ष करू नागराजन यांचाही समावेश आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वांकडून करण्यात आली. याच दरम्यान, तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर टीकास्त्र सोडले आणि शपथ घेतली. त्यांनी आपल्या पायातील बूट काढले आणि म्हणाले की जोपर्यंत राज्यातून द्रमुकचे सरकार पडत नाही, तोपर्यंत पायात बूट घालणार नाही.

अन्नामलाई यांनी शुक्रवारी (२७ डिसेंबर) ‘सर्व वाईटाचा नायनाट करण्यासाठी’ कोईम्बतूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे सहा वेळा फटके मारण्याचे वचन दिले आहे. तसेच राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व सहा पवित्र मंदिरांना भेट देण्यासाठी ४८ दिवस उपवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ भजनावरून भाजपाचा संताप, गायिकेला मागावी लागली माफी!

शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंगच केला असता!

अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पाकिस्तानने पोसलेले १५ हजार तालिबान्यांची पाकिस्तानवरच कूच

ते पुढे म्हणाले, ‘द्रमुक सरकार पाडेपर्यंत मी अनवाणी चालेन. मी लोकांना विनंती करतो की कृपया या सगळ्याकडे लक्ष द्यावे. ते पुढे म्हणाले: ‘नेहमीप्रमाणे, आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी पैसे देणार नाही. आपण पैसे न वाटता निवडणूक लढवू. जोपर्यंत डीएमके सरकार जात नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही.

Exit mobile version