तमिळनाडू भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्नामलाई यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत स्टॅलिन यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले.
ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून तमिळनाडूला मनरेगा योजनेअंतर्गत ३९,३३९ कोटी रुपयांचे ऐतिहासिक उच्चतम अनुदान मिळाले आहे. परंतु, मुख्यमंत्री स्टॅलिन, जर तुम्ही या योजनेच्या अंमलबजावणीतील अनियमिततेच्या जाळ्यात अडकले असाल, तर तुम्ही तमिळनाडूमध्ये या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यास संमती द्याल का?”
हेही वाचा..
कागदपत्रे नसली तरीही ती वक्फचीच जमीन!
मालाड: गुढी पाडव्यानिमित्त भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोघांना मुस्लिमांकडून मारहाण!
कुणाल कामरा आज चौकशीसाठी आज हजार होण्याची शक्यता
दंतेवाडा-बिजापूर सीमेवर महिला नक्षलीवादीला यमसदनी धाडले
अन्नामलाई म्हणाले, “तीन ते पाच पट अधिक ग्रामीण लोकसंख्या असलेल्या इतर राज्यांना मनरेगा अंतर्गत तमिळनाडूपेक्षा कमी निधी मिळतो, हे तुम्हाला माहीत आहे का?” त्यांनी विचारले, “द्रमुक सरकारने निवडणुकीत १०० दिवसांऐवजी १५० मनरेगा कामाचे दिवस देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याचा त्यांचा बेत कधी आहे?” अन्नामलाई यांनी तमिळनाडूमधील एका गावाचे उदाहरण देत मनरेगा निधीतील भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकार दबावात आले आहे.