24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषअण्णा विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरण; अन्नामलाई यांनी स्वतःला मारले चाबकाने फटके!

अण्णा विद्यापीठ लैंगिक छळ प्रकरण; अन्नामलाई यांनी स्वतःला मारले चाबकाने फटके!

४८ दिवस उपोषण करणार

Google News Follow

Related

तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के.अण्णामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारच्या विरोधात स्वतःला चाबकाने फटके मारून निदर्शने केली. जोपर्यंत एमके स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष सत्तेबाहेर होत नाही तोपर्यंत ते बूट घालणार नाहीत, अशी अण्णामलाई यांनी काल (२६ डिसेंबर) शपथ घेतली होती. आज त्यांनी घराबाहेर राहून स्वतःला चाबकाने फटके मारून घेतले.

अन्नामलाई यांनी स्वत:ला अर्धनग्न केले आणि कोईम्बतूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वत:ला चाबकाने फटके मारले. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेवून सरकार विरोधात निदर्शेन केली.

अन्नामलाई यांनी शुक्रवारी (२७ डिसेंबर) ‘सर्व वाईटांचा नायनाट करण्यासाठी’ कोईम्बतूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे सहा वेळा फटके मारण्याचे वचन दिले होते. तसेच राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व सहा पवित्र मंदिरांना भेट देण्यासाठी ४८ दिवस उपवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ते पुढे म्हणाले, ‘द्रमुक सरकार पाडेपर्यंत मी अनवाणी चालेन.

हे ही वाचा :

भारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

सरन्यायाधीश कैत यांच्या शासकीय निवासस्थानातून हनुमान मंदिर हटवले?

६ वर्षांपासून बेकादेशीररित्या दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक !

मनमोहन सिंग एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून स्मरणात राहतील

दरम्यान, तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी अण्णा विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय आरोपीला अटक केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे नाव ज्ञानशेखरन असे असून तो रस्त्याच्या कडेला बिर्याणी विकणारा होता. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली जेव्हा पीडित मुलगी आणि तिचा पुरुष मित्र जवळच्या चर्चमध्ये प्रार्थना करून विद्यापीठ कॅम्पसमध्ये परतत होते. दोघांनाही एका निर्जन ठिकाणी दोन जणांनी थांबवले आणि हल्लेखोरांनी विद्यार्थिनीला मारहाण करून मुलीवर बलात्कार केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा