24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअमेरिकेत आश्रयासाठी अनमोल बिश्नोईचा अर्ज!

अमेरिकेत आश्रयासाठी अनमोल बिश्नोईचा अर्ज!

प्रत्यार्पण लांबवण्यासाठी अनमोल बिश्नोईची खेळी?

Google News Follow

Related

अमेरिकी यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर अनमोल बिश्नोईने अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे. अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून त्याचावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. सोमवारी (१८ नोव्हेंबर ) त्याला अमेरिकेत अटक झाली होती. त्याने आता अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, भारत अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पपणाची मागणी करत आहे, प्रत्यार्पण लांबवण्यासाठी अनमोल बिश्नोईची खेळी आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

अनमोल बिश्नोई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी आहे. अनमोल बिश्नोई विरोधात भारतीय यंत्रणांकडून रेड कॉर्नर नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोईविरुद्ध नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर १८ अन्य गुन्हेही नोंदवले आहेत. तसेच अनमोलची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस देखील नुकतेच एनआयएने जाहीर केले होते. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी देखील अनमोल बिश्नोई भारताला हवा आहे. भारतासह कॅनडाला देखील अनमोल बिश्नोई हवा आहे. भारतीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक करण्यात आली. दरम्यान, अनमोल बिश्नोई सध्या आयोवा येथील कारागृहात असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :

अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द

बांगलादेशातील युनूस सरकारचा पर्दाफाश; अल्पसंख्य हिंदूंचा हिंसाचारात बळी गेल्याचे स्पष्ट!

निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी

दरम्यान, अनमोल बिश्नोईने आपला भाऊ लॉरेन्सच्या पावलावर पाऊल ठेवत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. ७  ऑक्टोबर २०२१ रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली होती.  २०२३ मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ‘भानू’ म्हणून ओळखला जाणारा, अनोल बिश्नोई बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून गेला होता, तो गेल्या वर्षी केनियामध्ये आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसून आला होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा