लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यात!

एनआयएच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समावेश

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यात!

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला सोमवारी (१८ नोव्हेंबर ) अमेरिकेत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतर ही कारवाई झाली आहे. अनमोल बिश्नोई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोईविरुद्ध नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर १८ अन्य गुन्हेही नोंदवले आहेत. तसेच अनमोलची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस देखील नुकतेच एनआयएने जाहीर केले होते. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी देखील अनमोल बिश्नोई भारताला हवा आहे.

हे ही वाचा : 

व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे

मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात

सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…

अतुल भातखळकरांची ‘विजय संकल्प रॅली’, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सहभाग!

दरम्यान, अनमोल बिश्नोईने आपला भाऊ लॉरेन्सच्या पावलावर पाऊल ठेवत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. ७  ऑक्टोबर २०२१ रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली होती.  २०२३ मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. ‘भानू’ म्हणून ओळखला जाणारा, अनोल बिश्नोई बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून गेला होता, तो गेल्या वर्षी केनियामध्ये आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसून आला होता.

 

Exit mobile version