22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषपाकिस्तानात लग्न करून बनलेली फातिमा पुन्हा भारतात अंजु बनून परतली!

पाकिस्तानात लग्न करून बनलेली फातिमा पुन्हा भारतात अंजु बनून परतली!

पाकिस्तानात जाऊन नसरुल्लासोबत केले होते लग्न

Google News Follow

Related

राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे.तिचे एक छायाचित्र समोर आले आहे.सहा महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात पोहोचली होती. सुरुवातीला ती तिथे फिरायला गेली होती असे सांगण्यात आले, पण नंतर तिने तिच्या पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केले. तसे, अंजूचे आधीच लग्न झाले होते. तिचे लग्न भारतातील अरविंद नावाच्या व्यक्तीशी झाले होते. पण इथून ती आपल्या मुलांना आणि पतीला सोडून वैध कागदपत्रे घेऊन पाकिस्तानात गेली.

अंजू कायमची भारतात परतली आहे की, पाकिस्तानात परत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वास्तविक, काही दिवसांपूर्वीच नसरुल्लाह यांची एक मुलाखत पाकिस्तानी मीडियामध्ये आली होती. यामध्ये त्याने अंजूला वाघा बॉर्डरवर सोडण्यासाठी आपण स्वतः येणार असल्याचे सांगितले होते. तिकडे भारतात ती आपल्या मुलांना भेटेल. मुलांना अंजूसोबत पाकिस्तानात यायचे असेल तर ते येऊ शकतात. पण जर त्यांना भारतातच राहायचे असेल तर ती त्यांची निवड आहे, असे नसरुल्लाह म्हणाले होते.दरम्यान, नसरुल्लाह म्हणाला होता की, अंजू फक्त तिच्या मुलांसाठी भारतात आली आहे, कारण तिला तिच्या मुलांची खूप आठवण येते. पण आता या सगळ्यावर अंजू काय बोलते हे पाहणे बाकी आहे.

अंजू जूनमध्ये राजस्थानमधील भिवडीहून पाकिस्तानात पोहोचली होती.ही बातमी तेव्हा आली जेव्हा पाकिस्तानी सीमा हैदर भारतात आली होती.भारतातून एक महिला पाकिस्तानात पोहोचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.ही बातमी समोर आल्यानंतर अंजु म्हणाली होती की, चार-पाच दिवसात परत येईन असे तिने सांगितले होते.पण त्यानंतर तिने नसरुल्लासोबत लग्न केले आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवले.नसरुल्लाह आणि अंजू यांनी लग्नाची बाब बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवली होती.

हे ही वाचा:

‘शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नाही’

‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा

ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले

पण नंतर त्यांचा प्री-वेडिंग व्हिडिओ आणि मॅरेज सर्टिफिकेट समोर आले. आता आपल्या लग्नाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नसरुल्लाह म्हणाले की, ‘त्यावेळी लग्न करण्याचा आमचा कोणताही विचार नव्हता. अंजू मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काही दिवसांसाठीच पाकिस्तानात आली होती. पण परिस्थिती अशी बनली की लग्न करावे लागले.माझे आता अंजूवर खूप प्रेम आहे आणि अंजु देखील माझावर खूप प्रेम करते, असे
नसरुल्लाह म्हणाले.

दरम्यान, अंजू अचानक आणि ते पण एकटी पाकिस्तानात पोहचल्याने कुटुंबही आश्चर्यचकित झाले होते.तेव्हा अंजूचा पती अरविंद म्हणाला होता की, अंजुने मला चार दिवसांपूर्वी सांगितले की ती ट्रीपला फिरायला जात आहे, मी तिला विचारले कुठे जाणार तर तिने सांगितले की, जरपूर जात आहे.मात्र, त्यांनतर अंजूने
व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे अरविंदशी संवाद साधला.तेव्हा तिने सांगितले की, ती पाकिस्तानमधील लाहोर येथे आहे आणि दोन-तीन दिवसात परत येईन.दरम्यान , अंजू भारतात परत आली आहे.ती आता काय बोलले यावर सगळ्यांचे लक्ष आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा