अंजू बॉबी जॉर्जची आणखी एक ऐतिहासिक उडी

अंजू बॉबी जॉर्जची आणखी एक ऐतिहासिक उडी

भारताची दिग्गज ऍथलीट अंजू बॉबी जॉर्ज यांना जागतिक ऍथलेटिक्सने त्यांच्या कार्यासाठी वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे. देशात लैंगिक समानतेचे समर्थन करण्यासाठी आणि देशातील युवा पिढीला घडवण्यास सातत्याने प्रयत्नशील असण्यासाठी अंजू यांना २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम महिलेचा बहुमान मिळाला.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत २००३ साली अंजू यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली होती. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात हा पुरस्कार सोहळा आभासी पद्धतीने पार पडला. त्यावेळी अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अ‍ॅथलेटिक्ससाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

हे ही वाचा:

‘वाघ’च म्हणतो बंद करा मांसाहार!

उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी

अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ

महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?

अंजू यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहेत. ‘हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. सकाळी उठून खेळासाठी काहीतरी करण्यापलीकडे दुसर चांगलं काहीही नाही. माझ्या प्रयत्नांचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, असे ट्विट अंजू यांनी केले आहे.

भारताची अंजू बॉबी जॉर्ज या माजी आंतरराष्ट्रीय लांब उडी खेळाडू आहेत. त्यांनी २०१६ मध्ये तरुण मुलींसाठी प्रशिक्षण अकादमी उघडली तसेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षा या नात्याने त्यांनी स्त्री- पुरुष समानतेचा सतत पुरस्कार केला, शालेय मुलींना खेळातील त्यांच्या नेतृत्वासाठी मार्गदर्शन करत आहेत, असे जागतिक ऍथलेटिक्सने एका प्रकाशनात म्हटले आहे.

Exit mobile version