शिवाजी पार्क प्राणी संग्रहालयातून प्राणी झाले गायब!

मरीन अॅक्वा झूमधून अजगर, घोरपडी, पाल अन् सरडे गेले चोरीला

शिवाजी पार्क प्राणी संग्रहालयातून प्राणी झाले गायब!

मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या मरीन अॅक्वा झूमधून प्राणी चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत.यामध्ये सहा अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे.झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेलेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय.या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्यानंतर हे प्राणी संग्रहालय चर्चेत आला होतं.या प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेची सोमवारी तोडक कारवाई झाली.संग्रहालयातील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत.यामध्ये सहा अजगर, दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा हे प्राणी चोरीला गेले असून प्राणी संग्रहालयातील चोरीला गेलेल्या प्राण्यांची किंमत तब्बल साडेचार लाख रुपयांच्या घरात आहे. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांनी केलेल्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘गाझामधील हल्ला म्हणजे तालिबानी मानसिकतेला चिरडणे’

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार

 

सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे. तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे.सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळण्याचे काम करतात.या प्राणी संग्रहालयात सध्या ससा, कोकेटेल, मलार्ड डक्स, कार्पेट पायथन,बॉल पायथन,अर्जेंटिना टाग्यू घोरपड, ब्ल्यू टंग स्किंग ( साप सुरळी), एम्पेरोर विंचू, इग्वाना, बंगाल मार्बल मांजर, रेड आयड स्लायडर कासव हे प्राणी आणि पक्षी तसेच अलिगेटर गार, अरोवना, फ्लॉवर हॉर्न, परोट फिश, पिराना, एंजल्स हे मासे या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत,

 

 

Exit mobile version