अनिल परब यांचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दम

वांद्रे येथील कार्यालय तोडल्यानंतर संतप्त झाले अनिल परब

अनिल परब यांचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दम

वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या वसाहतीमधील माजी मंत्री व उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांचे कार्यालय तोडण्यात आल्यानंतर संतप्त शिवसैनिक आणि अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना दमबाजी केली.

जे कार्यालय तोडण्यात आले तिथेच परब यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात तक्रार करणारे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली.

अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांना झापले. वांद्रे येथील कार्यालयाशी माझा संबंध आहे का? असे म्हणत हे कार्यालय तोडण्यासाठी म्हाडाने नोटीस का बजावली असा सवाल परब यांनी विचारला. ज्यांनी नोटीस काढली त्या अधिकाऱ्यांना आपल्यासमोर बोलवा, तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी भूमिका परब यांनी घेतली होती. अनिल परब म्हाडाच्या कार्यालयात पोहोचल्यावर पोलिसांनी परब यांच्यासोबत असलेल्या काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

अंदमान-निकोबर भूकंपाने हादरले

मंदीचे सावट तरी विकास दर ६.५ % राहण्याचा अंदाज

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप का होतेय व्हायरल?

गांधीनगर, वांद्रे पूर्व येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळ्या जागेत अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय होते. त्या कार्यालयावर हातोडा पडला. ही कारवाई नेमकी केली कुणी हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण म्हाडाने आपण या कार्यालयावर कारवाई केलेली नाही, असे म्हटले आहे.

मात्र त्यानिमित्ताने त्या परिसराला रणांगणाचे स्वरूप आले आहे. अनिल परब आणि शिवसैनिक हे आक्रमक झाले. त्यांनी किरीट सोमय्या यांनाच आव्हान दिले.

Exit mobile version