अनिल परब तुमच्या सरदारांना विचारा संजय राठोडांना क्लीन चीट का दिली?

दिशा सालियन प्रकरणावरून भाजपा आमदार विरोधकांशी भिडले

अनिल परब तुमच्या सरदारांना विचारा संजय राठोडांना क्लीन चीट का दिली?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी देखील याचिकेतून केली आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेचे विधीमंडळाच्या अधिवेशनातही पडसाद उमटताना दिसले. सत्ताधारी नेत्यांनी आवाज उठवत प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संजय राठोड यांचा उल्लेख करत चित्रा वाघ यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या उबाठाचे नेते अनिल परब यांना उत्तर देत चित्रा वाघ यांनी झाप-झाप झापलं. तुमच्या सरदारांनी (उद्धव ठाकरेंनी) क्लिन चीट का दिली हे सांगा?, असा सवाल चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना यावेळी विचारला.

भाजपा महिला आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. या प्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. त्याचा रिपोर्ट लोकांसमोर यायला हवा. जे खरे आहे ते जनतेसमोर यायला हवे, दूध का दूध पानी का पानी व्हायला पाहिजे. त्याच्यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी काय केले? मला जे करायचे होते ते मी केले. जे दिसले, पुरावे समोर आले त्यावर लढले मी आणि मला विचारता ते कसे काय मंत्री मंडळात आले?.

अनिल परब यांना उद्देशून चित्रा वाघ म्हणाल्या, अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का? उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी त्यांना क्लीनचीट का दिली?. अनिल परब हुशार आहेत, ते फार मोठे विधीज्ञ आहेत. आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत. ते का मंत्रिमंडळात आहे, त्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले. मग तुम्ही उत्तर दिलं नाही. सोयीप्रमाणे आपलं तोंड गप्प करायचं आणि महिलांवर दादागिरी करायची. तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा संजय राठोड यांना कोणत्या मुद्द्यावर क्लीनचीट दिली, याचे उत्तर द्या पहिला.

अनिल परब तुम्ही असाल मोठे वकील आणि पोपट पंडित. तुमच्या सारखे ५६ पायाला बांधून फिरते. काही नाही मिळाले म्हणून आमच्या घरादारावर येतात. जाता जाता म्हणाले, हिच्या नवऱ्याला पकडले. आम्ही लढलो, जिंकलो आणि माझा नवरा सगळ्यामधून निर्दोष बाहेर पडला. त्यावेळी खूप काही सहन केले, विरोधकांचे चेले चपाटे काही कमी नाहीत. मुलीला न्याय मिळावा म्हणून आम्ही लढलो. मात्र, यांच्या सरदाराने (उद्धव ठाकरेंनी) क्लिन चीट देवून टाकली आणि विषय संपवून टाकला.

आम्हाला हलक्यात घेवू नका, आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. आम्ही फक्त लढलो, एसआईटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हटलो तर यांचे हे हाल झाले आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल तेव्हा यांची हालत काय होईल?. आम्ही काय जास्त महिला नाही, तिघी चौघी नाही, बोलायचे आहे तर मुद्यांवर बोला, आमच्या घरावर का येताय?.

संजय राठोड यांना क्लीन चीट का दिली हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, प्रत्रकार म्हणतात ते भेटत नाहीत, बोलत नाहीत. मग काय आम्हाला पकडणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या, या प्रकरणात माझे नाव घेतले म्हणून मी बोलले नाहीतर अनिल परब यांच्याशी माझा काडीचा-लांबचा संबंध नाही.

हे ही वाचा : 

लष्कराला मिळणार बळकटी; स्वदेशी प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम खरेदीला मंजुरी

दोन मिनिटांत सिद्ध होऊ शकते, आदित्य ठाकरेंचे निर्दोषत्त्व!

जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करणार नाही

‘दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात सेवादार, मग पंजाबात आता दडपशाही का?’

या प्रकरणी भाजपा आमदार अमित साटम म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात आतापर्यंत कोणताही निष्कर्ष समोर आलेला नसून काल संध्याकाळी सतीश सालियन यांनी काही आरोप केले आहेत. यामध्ये दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांना आला आहे. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मविआवर आरोप करत ते म्हणाले, दिशा कुटुंबांचा आरोप आहे कि त्यावेळेच्या मविआच्या सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या महापौर ( किशोरी पेडणेकर) यांनी त्यांची भेट घेत दिशाभूल करण्यात आल्याचे सतीश सालियन यांनी सांगितले. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर येण्यापासून आणि चौकशी मागणीसाठी रोखले, दबाव आणण्यात आला. त्यामुळे त्यावेळी समोर येता आले नाही. मात्र, आता ते समोर येत आहेत. त्यांना संशय नाहीतर पूर्ण खात्री आहे कि दिशावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. त्यावेळी शासनात असेलेले मंत्री जबाबदार आहेत. मविआच्या एका मंत्र्यामुळे ही घटना घडल्याचा त्यांना संशय आहे, असे अमित साटम म्हणाले.

डिसेंबर २०२२ मध्ये जी एसआयटी नेमलेली होती. त्यांनी काय चौकशी केली?, निष्कर्ष काय आला?, हे समोर कधी येणार?. कुटुंबाने काल घेतलेल्या नावांमध्ये दिशाचे चार मित्र आहेत, तत्कालीन शासनातले मंत्री, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत. या सर्वांची चौकशी करणार का?, घटना होवून पावणे पाच वर्ष झाली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करत आहेत?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपा मंत्री नितेश राणे म्हणाले, अशा पद्धतीचा बलात्काराचा आरोप ज्याच्यावर होतो त्याला तत्काळ अटक करून चौकशी केली जाते. अन्य लोकांना हा कायदा लागू होतो मग सर्वांवर तशी कारवाई झाली पाहिजे. मंत्री नितेश राणेंच्या या मागणीला शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांनी सहमती दर्शविली. ते म्हणाले, जो सामान्य माणसाला नियम आहे, तोच नियम मंत्री, माजी मंत्र्याला देखील असला पाहिजे. संबंधित आरोपीला तत्काळ अटक करून त्याची चौकशी करा.

शिवसेनचे नेते रामदास भाई कदम यांनी यावर प्रतिक्रिया देताना उबाठावर जोरदार टीका केली.  ते म्हणाले, बाळासाहेबांनी मराठी मुलींची आबरू वाचवली त्यांच्या नातुवर बलात्काराचे आरोप होत आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडी तरी लाज असती तर ते तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कदम यांनी केली.

 

Exit mobile version