मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूक वाद
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची घटना तसेच नियमांची पायमल्ली सतत होते आहे. २४ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक ही खुली निवडणूक न घेण्याच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने जाहीर केलेल्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत अनिल गलगली यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक घटनेच्या नियम १०.१ प्रमाणे खुली निवडणूक व्हायला हवी. प्रत्येक सभासदाला मतदान करून अध्यक्ष/उपाध्यक्ष निवडून देण्याचा हक्क मिळायला हवा असे अनिल गलगली यांचे न्यायोचित स्पष्ट मत आहे. यासाठी गलगली यांनी विनंती पत्र लिहून सर्व सभासदांना निवडणूकीबाबत माहिती देण्याची तसेच आवश्यक भासल्यास निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु गलगली यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले व ६००० पेक्षा अधिक सभासदांऐवजी केवळ ३४ साधारण सभेवर निवडून आलेल्या सभासदांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणूक घेतली जात आहे. निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयाला कोणत्याही नियमाचा आधार नाही आणि निर्णयामुळे गलगली व्यथित झाले आहेत.
हे ही वाचा:
हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला
काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?
पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच; मिथुन घोषला मारले
‘भाजपाचे सरकार खड्यासारखे दूर करा, हे चार खासदार असलेले पवारच सांगू शकतात’
लेखी पत्र देऊनही निवडणूक अधिकारी असो किंवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने घटना आणि नियमांची सरळसरळ पायमल्ली केली आहे. या विरोधात अनिल गलगली यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघार घेतल्यानंतर अनिल गलगली यांनी हे ही स्पष्ट केले आहे की अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय फक्त त्यांच्याशी संबंधित नाही. हा प्रश्न समस्त सभासदांच्या हक्कांशी संबंधित आहे. त्यामुळे योग्य त्या न्यायपीठाकडे दाद मागण्याचा अधिकार राखून ठेवीत आहे.