एका वर्षानंतर अनिल देशमुख येणार तुरुंगातून बाहेर

अनिल देशमुख गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तुरुंगात

एका वर्षानंतर अनिल देशमुख येणार तुरुंगातून बाहेर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सीबीआयने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे देशमुख यांच्या अर्जावर स्थगिती वाढवण्याची मागणी केली होती. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा उद्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. जवळ जवळ एका वर्षानंतर ते तुरुंगातून बाहेर पडणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अनिल देशमुख यांना १२ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितल्याने या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे.

सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात जानेवारीत सुनावणी होणार आहे. यानंतर तपास यंत्रणेने देशमुख यांना जामीन देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्याला मंजुरी देत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ डिसेंबर रोजी ठेवली होती. दरम्यान, सीबीआयने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाला सुटी असल्याने जानेवारी २०२३ मध्येच सुनावणी होण्याची शक्यता होती.

हेही वाचा :

कर्नाटक सरकार चिथावणी देण्याचे काम करते, मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे आपणच वारसदार!

गुजरात एटीएस, तटरक्षक दलाने पकडले पाकिस्तानी तस्कर; ३०० कोटींचा माल जप्त

राहुल गांधींना ‘तपस्वी’ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा; प्रभू श्रीरामाशीही तुलना

अशा परिस्थितीत सीबीआयने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णिक यांना देशमुख यांना जामीन देण्याच्या आदेशाला ३ जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याची विनंती केली. ही विनंती मात्र सीबीआयला कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने मान्य केली नाही. सतरा दिवसांच्या स्थगितीस सीबीआय जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास अपयशी ठरले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तुरुंगात आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. मनी लाँड्रिंगशी संबंधित ईडी प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना ऑक्टोबरमध्येच जामीन मंजूर केला आहे. अशा स्थितीत सीबीआय प्रकरणात जामीन मिळाल्याने देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version