अनिल देशमुख यांनी रिकामे पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये. पुरावे असतील तर तात्काळ जाहीर करावे. तुम्ही पुरावे सादर करताच तीन तासाच्या आत तुमच्या ऑडियो क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्यांचा पर्दाफाश करू, असे आव्हान भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. महाविआचे सरकार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर दबाव आणल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. देशमुखांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, आमच्याकडेही पुरावे आहेत. पुराव्या शिवाय मी काही बोलत नाही. वेळ पडली तर त्या ऑडियो क्लिप्स जनतेसमोर बाहेर आणाव्या लागतील, असे उपमुख्यंमत्री फडणवीस म्हणाले होते.
हे ही वाचा:
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल, अशोक हॉल आता ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’
हिंदू प्रशिक्षणार्थींना मुस्लिमांशी लग्न करण्यासाठी दबाव
लवासा सिटीमध्ये दरड कोसळली, ३ बंगले दरडीखाली !
मुख्यमंत्री केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !
यावर आज पुन्हा अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माझ्याकडे पुरावे असल्याचे सांगितले. ऑडियोच्या क्लिप्स पेनड्राइव्हमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेनड्राइव्हवरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांचा संचार घेतला आहे. अनिल देशमुखांनी पुरावे सादर केल्यास तीन तासाच्या आत भाजप देखील ऑडियो क्लिप्स सादर करेल, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले की, अनिल देशमुख यांनी रिकामे पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये. खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते. अशी सोंग करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तत्काळ जाहीर करा. आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच ३ तासाच्या आत तुमच्या ऑडियो क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्यांचा पर्दाफाश करू, फक्त ३ तास अनिलबाबू, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी रिकामे पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये..
खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते.
अशी सोंग करण्यापेक्षा तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तत्काळ जाहीर करा..आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच 3 तासाच्या आत तुमच्या ऑडियो क्लिप्स महाराष्ट्राच्या… pic.twitter.com/4J0kvINVHE
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 25, 2024