विराट कोहलीच्या धावगतीवर टीका करणाऱ्या समीक्षकांवर कोहलीने टीका केली होती. मात्र त्याच्या या टीकेमुळे आता महान फलंदाज सुनील गावस्कर संतापले आहेत. तुमच्या खेळाबद्दल बोलणाऱ्या बाहेरच्या लोकांची तुम्ही पर्वा करत नाहीत, तर मग अशा ‘बाहेरच्या आवाजाला’ तुम्ही प्रत्युत्तर का देता, असा प्रश्न सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला.
कोहलीने टीकाकारांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले. ‘जे धावगतीबद्दल बोलतात आणि मी फिरकीपटूविरोधात चांगला खेळू शकत नाही, असे सांगतात, त्यांनाच हे असं काहीबाही बोलायला आवडतं. तुम्ही तुमच्या संघासाठी सामना जिंकून दिला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नसता, तेव्हा बॉक्समध्ये बसून खेळाबद्दल बोलणे कितपत शक्य होते, हे मी सांगू शकत नाही. माझे काम आहे, संघाला विजय मिळवून देणे. लोक बसून त्यांच्या स्वतःच्या कल्पना आणि गृहितके मांडतात. परंतु जे सातत्याने हेच करत आहेत, त्यांना हे चांगलेच माहीत आहे की ते काय करत आहेत,’ असे कोहली म्हणाला होता. गावस्कर यांनी ही टीका गंभीरपणे घेतली आहे.
हे ही वाचा:
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
कथित अनुचित कपडे परिधान करून व्हिडीओ
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह
समालोचकांनी तेव्हाच प्रश्न विचारला, जेव्हा धावगती ११८ होती. मी जास्त सामने बघत नाही, त्यामुळे मला माहीत नाही, की अन्य समालोचक काय म्हणाले. मात्र जर तुमची धावगती ११८ आहे तर तुम्ही १४व्या किंवा १५व्या षटकांत याच धावगतीवर कसे बाद होता? जर तुम्हाला त्यासाठी कौतुकाची अपेक्षा आहे, तर वेगळी गोष्ट,’ असे गावस्कर म्हणाले. गावस्कर यांनी कोहली याच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला. ‘समालोचक केवळ आपले काम करतात. त्यांचा कोणताही छुपा अजेंडा नसतो,’ असे ते म्हणाले.
‘ही सारी मंडळी म्हणतात, आम्हाला बाहेरच्या लोकांची पर्वा नाही. मग तुम्ही या बाहेरच्या आवाजाची किंवा जो कोणी आहे, त्याला प्रत्युत्तर का देत आहात. आम्ही सर्व थोडेफार क्रिकेट खेळलो आहोत, अधिक नाही. आमचा कोणताही अजेंडा नाही. आम्ही तेच बोलतो, जे दिसते. आमचा कोणी आवडता किंवा नावडता खेळाडू नाही आणि तसे असेलही तरी आम्ही तेच बोलतो, जे घडते आहे,’ असे गावस्कर यांनी स्पष्ट केले.
गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवरही टीका केली. ‘विराट कोहलीची ती खास मुलाखत या चॅनलवरही दाखवली गेली आहे. या कार्यक्रमातही सहा वाजल्यापासून आतापर्यंत ती सहावेळा दाखवण्यात आली आहे. मला वाटते, ते समजू शकतील की टीकाकार हे समालोचक आहेत. त्यांनी हे पुरेशा वेळा दाखवले आहे, सर्वांपर्यंत संदेश पोहोचला आहे,’ असे ते म्हणाले.