26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरविशेषरोड शो दरम्यान दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी!

रोड शो दरम्यान दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी!

डोळ्याच्या वर झाली दुखापत

Google News Follow

Related

एका रोड शोदरम्यान दगडफेक झाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी जखमी झाल्याची घटना शनिवारी विजयवाडा येथील घडली. या रोड शो दरम्यान अनेक दगड फेकण्यात आले. त्यातील एक दगड मुख्यमंत्र्यांना लागला. मुख्यमंत्र्यांना डोळ्याच्या वर दुखापत झाल्याचे समजते.

युवाजना श्रमिका रायुथु काँग्रेस पक्षाचे (व्हाएसआरसीपी) आमदार वेल्लाम्पल्ली श्रीनिवासा राव हेदेखील या रोड शो दरम्यान उपस्थित होते. तेही या दगडफेकीत जखमी झाले. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर बसमध्येच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा ‘मेमान्था सिद्धम बस यात्रा’ या रोड शोमध्ये सहभाग घेतला.

‘मुख्यमंत्र्यांची बस विजयवाडामधील सिंग नगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरजवळ आली असताना यात्रेदरम्यान लोकांचे अभिवादन स्वीकारत असताना एक दगड त्यांना लागला,’ असे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून देण्यात आले. हा हल्ला तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा दावा व्हायएसआरसीपीच्या नेत्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

इराणकडून ड्रोन हल्ला; इस्रायल देणार प्रत्युत्तर

रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

गोपी थोटाकुरा ठरणार पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

आयपीएलच्या ‘या’ पाच संघांकडे आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी ‘एक्स’वरून शुभेच्छा दिल्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या हल्ल्याचा ‘एक्स’वरून निषेध केला. ‘राजकीय मतभेदाचे रूपांतर हिंसाचारात होऊ नये,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे आमदार केटी रामा राव यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. लोकशाहीत हिंसाचाराला थारा असता कामा नये. आशा आहे की, निवडणूक आयोग यासाठी योग्य ती पावले उचलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आंध्र प्रदेशमधील २५ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी निवडणुका होत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा