आपल्या अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अख्तर यांनी दाखल केलेला हा खटला दुसऱ्या न्यायालयात स्थानांतरित करायला नकार देण्यात आला आहे. हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग केला जावा अशी मागणी कंगना रानौतच्या वतीने तिच्या वकिलांनी केली होती. पण याला अंधेरी न्यायालयाने नकार दिला आहे.
अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी इतरत्र स्थानांतरित करण्यासाठी कंगनाने अर्ज केला होता. पण कंगना मार्फत करण्यात आलेला हा अर्ज अंधेरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कंगना रानौतसाठी हा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व
५० रुपये चोरले म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या
या पूर्वी किल्ला कोर्टाने देखील जावेद अख्तर मानहानी प्रकरणाची सुनावणी इतर कोर्टात स्थाननन्तरित करण्याची कंगना रानौतची मागणी फेटाळली होती. कंगनाच्या विरोधात गीतकार जावेद अख्तर ह्यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानि याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टासमोर न करता इतर कोर्टात स्थानांतरित करण्यात यावी ह्यासाठी कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र किल्ला न्यायालयाप्रमाणेच आता सत्र न्यायालयानेही कंगना विरोधातील खटला इतर न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी फेटाळली आहे.