‘मेट्रो ७ अ’ ही ३ किलोमीटरची मार्गिका पुढच्या वर्षी सुरु करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व ते विमानतळ अशा भूमिगत मेट्रोच्या भुयारीकरणाचे काम आता एमएमआरडीने सुरु केले आहे.
हेही वाचा..
‘सनातन धर्म म्हणजे मलेरिया, डेंग्यूसारखा…’
बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार
क्रिकेटचाहत्यांच्या इच्छांवर फेरले गेले पावसाचे पाणी, भारत-पाक सामना रद्द
महाविकास आघाडी नेत्यांची मराठा आरक्षण आंदोलकांना भेटण्यासाठी चढाओढ
महामुंबई प्रदेशात वेगवेगळ्या अशा १४ मेट्रो मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी तीन मार्गिका सुरूही झाल्या आहेत. उर्वरित सात मार्गिकांच्या उभारणीचे काम सुरु आहे. त्यातील सातवी मार्गिका अंधेरी पूर्व (गुंदवली) ते छत्रपती शिवाज महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल २) अशी आहे. तिचे प्रत्यक्ष काम शनिवार, २ सप्टेंबरला सुरू झाले. ‘एमएमआरडीए’ने ‘एक्स’वर व्हिडीओद्वारे ही माहिती दिली.ही मार्गिका एकूण ३.१७५ किमी लांबीची असेल. त्यापैकी २.४९ किमी भूमिगत असेल. मार्गिकेच्या या भागासाठी बोगदा खणण्यास सुरुवात झाली आहे. विमानतळाच्या टर्मिनल-२समोरील भागातून तो खणला जात आहे. दुसऱ्या बाजूकडील उन्नत भाग काही प्रमाणात तयार आहे. विमानतळ, विमानतळ वसाहत (अंधेरी) व अंधेरी पूर्व (गुंदवली), अशी तीन स्थानके यावर असतील. विमानतळ टर्मिनल-२ येथे ही मार्गिका मेट्रो-३ (आरे ते कफ परेड) या अन्य भूमिगत मार्गिकेला संलग्न होईल, तर अंधेरी पूर्व येथे ही मार्गिका मेट्रो-७ला संलग्न होणार आहे. ‘शनिवारी भुयारीकरण सुरू झाल्यानंतर मे २०२४ पर्यंत ही मार्गिका पूर्ण करण्याचे नियोजन आहे’, असे ‘एमएमआरडीए’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.