मोदी विरोधक कॉमेडियन कुणाल कामरा यांचे पुढील २० दिवस बंगलोरमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत खात्यावरून एका ट्विटमध्ये दिली. मायक्रोब्लॉगिंग साइटवर बातमी जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये, त्यांनी सांगितले की अचानक कार्यक्रम रद्द करण्याचे अधिकृत कारण म्हणजे त्या ठिकाणी ४५ लोकांना बसण्याची परवानगी नाकारणे हे आहे. ते म्हणाले की, दुसरे कारण, आयोजकांना धमक्या दिल्या गेल्या की तो तेथे कार्यक्रम करणार असेल तर ते ठिकाण बंद केले जाईल. या धमक्या कोणी दिल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. “माझा अंदाज आहे की हा देखील कोविड प्रोटोकॉल आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा एक भाग आहे. मला वाटते की मला आता व्हायरसचा एक प्रकार म्हणून पाहिले जात आहे.” असं तो म्हणाला.
राष्ट्रवादी गटांच्या निषेधामुळे गेल्या दोन महिन्यांत त्याचे किमान १२ शो रद्द करण्यात आल्यानंतर कॉमेडियन मुनावर फारुकी याने आणखी कोणतेही शो न करण्याचे संकेत दिल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. फारुकीने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या एका कॉमेडी शोमध्ये “हिंदू देवी-देवतांचा अपमान” केल्याच्या आरोपाखाली एक महिना तुरुंगात घालवला होता. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला माध्यमांना सांगितले होते की त्याच्या विनोदांमध्ये कोणतीही समस्या नाही. ड्रायव्हर आणि रक्षकांसह सुमारे ८० लोक एकाच शोमधून उदरनिर्वाह करतात असे त्यांनी सांगितले होते. परंतु हिंदू देवी देवतांचा अपमान करणारे त्याचे भाषण मात्र सर्वत्र वायरल झाले होते.
हे ही वाचा:
पत्रकारांवर चीनचे सरकार अशी ठेवणार पाळत
युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा
चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत
आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब
कॉमेडियन कामरा यांनी अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करत प्रसिद्धी मिळवली. परंतु दरम्यानच्या काळात हिंदू धर्म आणि देवीदेवतांवरही त्याने टीका केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर मोदी समर्थकांवरही त्याने अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली होती. शिवाय सीएए, शेतकरी कायदे, कलम ३७० या सर्व मुद्यांवरदेखील मोदी सरकारविरोधात त्याने राजकीय भूमिका घेतली होती. यामुळेच काही राष्ट्रवादी गटांनी कामराचा निषेध करत त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी आयोजकांकडे केली होती.