आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

आव्हाडांना अनंत करमुसे यांनी खडेबाल सुनावले आहेत. 

आम्हाला परिवार नाही का? करमुसेंचा आव्हाड यांना सवाल

भाजपा महिला पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करत आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला. मुब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी आव्हाडांनी न्यायालयाद दाद मागितली. आव्हाडांना तो जामीन मंजूरही करण्यात आला. यादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने माझ्या वडिलांवर कसा खोटा गुन्हा दाखल केला हे सांगितले होते. मात्र, यावरून आव्हाडांना अनंत करमुसे यांनी खडेबाल सुनावले आहेत.

२०२० मध्ये अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केली होती. त्यावेळी आव्हाडांच्या सुरक्षा रक्षकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्याच निवासस्थानी करमुसे यांना बेदम मारहण केली होती. करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली होती, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, सध्या अनंत करमुसे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले, चार दिवस झाले ठाण्यामध्ये राजकारण सुरु आहे. मला या प्रकरणावर काही बोलायचं नव्हतं. मात्र, आव्हाडांची कन्या म्हणाली, माझ्या वडिलांवर खोटा आरोप केला आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण परिवार त्रास सहन करत आहे. तर तुझ्या बाबांनी जे केलं त्यामुळे आम्हाला त्रास झाला नाही का? असा सवाल करमुसे यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

११ वर्षे सावरकरांसारखा यातना भोगणारा काँग्रेसचा नेता दाखवा!

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

कीर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे संजय निरुपमना संताप

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस करणार आफताबची नार्को टेस्ट

पुढे ते म्हणाले, मलाही दोन मुली आहेत, मलाही परिवार आहे, आजसुद्धा माझा परिवार त्रास सहन करत आहे. पण मी माझा परिवार कधी मध्ये आणला नाही. स्वतःवर आल्यावर स्वतःचा परिवार मध्ये करून अशा गोष्टीतून बचाव करणं ही त्यांची नेहमीची सवय आह. सामान्य माणसांना सुद्धा परिवार असतो, असं कारमुसे म्हणाले आहेत. एवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला असल्याचे करमुसे म्हणाले.

Exit mobile version