26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषअनंत अंबानीचा "वनतारा", हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!

अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!

जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र, रिलायन्स ग्रुप फाउंडेशनचा उपक्रम

Google News Follow

Related

अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ या प्रकल्पाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘वनतारा’ हे जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे.या केंद्रामध्ये भारत आणि परदेशात जखमी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित केले जाते.’वनतारा’ हा भारतातील अशा प्रकारचा उपक्रम आहे, ज्यामध्ये संपूर्ण प्राण्यांची काळजी घेतली जाणार आहे.रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

गुजरातच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.तब्बल ३००० एकर जागेत हा प्रकल्प पसरलेला आहे.विशेष म्हणजे ‘वनतारा’ हे केंद्र जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र असणार आहे.’वनतारा’ हा शब्द वन आणि तारा या दोन शब्दांपासून घेण्यात आला आहे.याचा अर्थ जंगलाचा तारा असा होतो.रिलायन्स ग्रुपच्या फाउंडेशनच्या वतीने हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.वास्तविक भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला आईचे स्थान दिले गेले आहे.या निसर्गात राहणारे सर्व प्राणी आपले कुटुंब मानले जातात.या कुटुंबासाठी ‘वनतारा’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत जगभरातील प्राणी आणि वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या देश-विदेशातील जखमी, शोषित प्राण्यांवर या केंद्रामध्ये उपचार केले जातात.उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसनही केले जाते.

हे ही वाचा:

डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे

अयोध्या, श्रीनगरमध्ये होणार ‘महाराष्ट्र दर्शन’

अजित पवारांकडून सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी

ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?

वनताराच्या संकल्पनेवर रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक अनंत अंबानी म्हणाले की, हा प्रकल्प माजी आवड होती. लहापासूनच मला जखमी,असहाय्य प्राण्यांना मदत करणे आवडायचे.माझ्या मनातील हे काम आज एक मिशन बनले आहे.रिलायन्स फाऊंडेशनचे काही वचनबद्ध लोक या कामात गुंतले आहेत.ही टीम सध्या गंभीर जखमी आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांना मदत करत आहे, असे अनंत अंबानी यांनी सांगितले.

दरम्यान, वनतारा या आश्रयस्थानात २०० हत्ती, बिबट्या, वाघ, सिंह आणि जग्वार यांसारख्या ३०० हून अधिक, मोठ्या मांजरी आणि मगरी, साप आणि कासव, ३,००० हून अधिक तृणभक्षी जसे की हरीण आणि १,२०० सरपटणारे प्राणी आहेत. हे सर्व प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ आणि मान्यता प्राणीसंग्रहालय नियम, २००९ अंतर्गत दिलेल्या तरतुदींनुसार संबंधित राज्यांच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्यानंतर केंद्रात आणले गेले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा