रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा ‘जामनगर ते द्वारका’ असा पायी प्रवास आज (६ एप्रिल) पूर्ण झाला. ‘जामनगर ते द्वारका’ असे एकूण १७० किमी अंतर त्यांनी पार केले. अनंत अंबानी यांच्या आई आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर अनंत त्यांच्या कुटुंबासह द्वारकाधीश मंदिरात पोहोचले आणि दर्शन घेतले. दरम्यान, अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका हा १७० किमीचा प्रवास पूर्ण केला. पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी पत्नी राधिका मर्चंट आणि आई नीता अंबानी देखील सोबत आल्या.
अनंत अंबानींच्या पदयात्रेला २९ मार्च रोजी सुरुवात झाली. जामनगरमधील मोती खावडी येथून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. वाहतूक आणि सुरक्षेमुळे लोकांना अडचणी येऊ नयेत म्हणून अनंत अंबानी रात्रीचा प्रवास करत असत. दररोज ते २० किमी अंतर चालत होते. यासाठी ते ७ तास चालत असत. अनंत अंबानी यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस आहे आणि ते आपला ३० वा वाढदिवस द्वारकेत साजरा करणार आहेत. यासाठी त्यांनी ‘जामनगर ते द्वारका’ असा पायी प्रवास करण्याचे ठरवले होते.
हे ही वाचा :
श्रीरामलल्लाच्या कपाळावर सूर्य तिलक
जबलपूरमध्ये मुस्लिमांनी कसे केले वक्फ विधेयकाचे स्वागत
जाणून घ्या…अमृतसर पोलिसांची दहशतवादी नेटवर्कविरोधात मोठी कारवाई
गोवंडीत बेकायदेशीर ७२ मशिदींच्या भोंग्याविरोधात सोमय्यांची गर्जना, तक्रार दाखल!
अनंत अंबानींची पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर नीता अंबानी म्हणाल्या, ‘जामनगर ते द्वारका’ ही पदयात्रा पूर्ण केल्याबद्दल मुलाचा अभिमान आहे. एक आई म्हणून, माझा लहान मुलगा अनंत द्वारकाधीशांच्या या दिव्य स्थानाची पदयात्रा पूर्ण करत असल्याचे पाहणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या १० दिवसांपासून, अनंतच्या पदयात्रेत सहभागी असलेले सर्व तरुण आपल्या संस्कृतीचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. मी भगवान द्वारकाधीशांना अनंतला शक्ती देण्याची प्रार्थना करते, असे नीता अंबानी म्हणाल्या.