26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषअनंत अंबानीने गिफ्ट केली शाहरुख, रणवीरसह खास सेलिब्रिटिंना २ कोटींचे घड्याळ !

अनंत अंबानीने गिफ्ट केली शाहरुख, रणवीरसह खास सेलिब्रिटिंना २ कोटींचे घड्याळ !

Google News Follow

Related

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटसोबत १२ जुलै रोजी दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. अनंतने आपल्या लग्नासाठी आलेल्या काही खास व्यक्तीना लक्झरी ऑडेमार्स पिग्युट लिमिटेड-एडीशनचे लक्झरी घड्याळे भेट दिली. या घड्याळाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे.

हे घड्याळ त्याने अभिनेता शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांच्यासह सर्व वऱ्हाडींना दिली आहेत. सध्या समाज माध्यमात या घड्याळ गिफ्टची जोरदार चर्चा सुरु आहे. हे लक्झरी घड्याळ ९.५ मिमी जाड आहे आणि त्यात ४१ मिमी १८ K गुलाबी सोन्याचे केस आणि एक नीलम क्रिस्टल बॅक आहे. डायल गुलाबी सोन्याची आहे. ग्रांडे टॅपिसरी पॅटर्न आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वऱ्हाडी त्यांची घड्याळे दाखवत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा..

जम्मू काश्मीरमध्ये हिंदू यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला

लाल दिवा लावलेली पूजा खेडकरची गाडी जप्त !

२० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडली गोळी !

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध !

अनंत अंबानींनी सर्व मित्रांना लग्नासाठी खास भेट दिली आहे, असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या इन्स्टाग्राम हँडलवर लिहिण्यात आले आहे. यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. या लग्न सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून ते किम आणि ख्लो, जॉन सीना ते शाहरुख खान, महेंद्रसिंग धोनी ते बाबा रामदेव, विविध उद्योगांतील सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर आले होते. प्रियांका चोप्रा जोनास, जॉन सीना, अनन्या कपूर, रणवीर सिंग, शनाया कपूर, शिखर पहारिया यांची मिरवणूक सुद्धा चर्चेत आली होती.

गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानीच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात झाली होती. त्यात रिहानाचा थेट परफॉर्मन्सही होता. त्यानंतर बॅकस्ट्रीट बॉईज आणि कॅटी पेरी यांच्या परफॉर्मन्ससह फ्रान्स ते इटली या क्रूझवर बॅश करण्यात आला. भव्य संगीत कार्यक्रमात जस्टिन बीबर पाहुण्यांसाठी लाइव्ह परफॉर्म करत होता. १४ जुलै रोजी “मंगल उत्सव” या स्वागत समारंभाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा