शिर्डीच्या साईबाबांना दान देणाऱ्या भक्तांची कमी नाही.रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने सोमवारी शिर्डी साई मंदिरात जाऊन दुपारच्या आरतीत भाग घेतला. दिवाळीनिमित्त त्यांनी मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हा धनादेश मंदिराचे सीईओ यांना सुपूर्द केला आहे. सुमारे तासभर ते शिर्डीच्या साईबाबा मंदिरात होते.
अनंत अंबानी यांनी ट्रस्टच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांना दीड कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. शिर्डी येथे साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांनी हा धनादेश दिला.अनंत अंबानी यांनी सुमारे १ तास मंदिराच्या प्रांगणात थांबून दुपारची आरतीही केली. यावेळी त्यांच्यासोबत मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते. आरती संपल्यानंतर त्यांनी सीईओ यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला असे ट्रस्टने म्हटले आहे.
अनंत अंबानींनी दान केलेली रक्कम ट्रस्टच्या कल्याणकारी योजनांमध्ये खर्च केली जाईल, असे साई बाबा मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या काळात अंबानी कुटुंब ट्रस्टच्या मदतीसाठी पुढे आले होते. त्यानंतर मंदिरातर्फे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटसोबतच आरटी पीसीआर लॅबचा खर्चही त्यांनी केला होता . यावर्षीच्या दिवाळीला बंगळुरू येथील पंच परेश यांनी साईबाबा मंदिर फुलांनी सजवण्यासाठी देणगी दिली, तर कानपूरच्या कविता कोटवानी कपूर आणि शनी शिंगणापूर येथील गणेश साठे या दोन भाविकांनी मंदिरातील दिवाबत्तीच्या कामासाठी देणगी दिली.
हे ही वाचा:
जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष
म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू
ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी
जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद
मुकेश अंबानी यांनी १४ ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथमध्ये दर्श घेतले होते. त्यावेळी त्यांनी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची देणगी दिली. याआधी सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानी केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते आणि त्यांच्या ‘अन्नदानम’ निधीसाठी १.५१ कोटी रुपये दान केले होते.