नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात चोल साम्राज्याचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात चोल साम्राज्यातील महान शासक राजा राजा चोल यांच्याबद्दल उल्लेख आहे. त्यांच्या धर्मावरून सध्या वाद सुरू झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी राजा राजा चोला हे हिंदू नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी देखील या वक्तव्याचे समर्थन केले आहे. यानंतर लेखक आनंद रंगनाथन यांनी कमल हसन यांना सणसणीत टोला लगावला आहे.
“मी कमल हसन यांच्याशी सहमत आहे. १०१० मध्ये इंटर लॉकिंग दगडांनी बांधलेले रॉजर रॉजर क्लो यांनी बांधलेले भव्य बृहदीश्वर चर्च ज्यावर १५ हजार कारागिरांनी सहा वर्षे परिश्रम घेतले, असे येशू ख्रिस्ताला समर्पित आहे,” असे ट्विट आनंद रंगनाथन यांनी केले आहे.
I agree with Kamal Hassan. The magnificent Brihadisvara Church, built by Roger Roger Chloe in 1010, constructed by interlocking stones, crowned by an 81 ton rock, and built by 15000 men who toiled on it for 6 years, is dedicated to Jesus Christ. Hallelujah! https://t.co/qjkxYGG2li
— Anand Ranganathan (@ARanganathan72) October 6, 2022
एका कार्यक्रमादरम्यान, वेत्रीमारन यांनी वक्तव्य केले की, “आमची ओळख आधीच पुसली जात आहे. तिरुवल्लुवरला भगवा पांघरणे असो किंवा राज राजा चोलला हिंदू राजा म्हणून सादर करणे असो, अशा गोष्टी होतच असतात.
यालाच पाठींबा देत कमल हसन म्हणाले की, “राजाराजा चोलनच्या काळात हिंदू धर्म असे काही नव्हते. तेथे वैनवम्, शिवम् आणि जैनिजम होते आणि ब्रिटीशांनी हिंदू असे नाव दिले कारण त्यांना या सगळ्यांचा एकत्रितपणे संदर्भ कसा घ्यावा हे माहित नव्हते.
हे ही वाचा:
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त
उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार
मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक
‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या १९५५ च्या पुस्तकावर आधारित आहे.