खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

उद्योगपती आणि महिंद्र उद्योगसमुहाचे प्रमुख आनंद महिंद्र हे नेहमीचं ट्विटरवर चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एका लहान मुलाचं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये तो मुलगा एकामागून एक न थांबता फ्लिप मारत होता. खेळाडूंची पुढची पिढी आता तयार होतेय, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे.

तमिळनाडूतील तिरुनेलवेली गावातून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या मुलाचा हा व्हिडीओ आहे, त्याच्या मित्राने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आणि आनंद महिंद्रा यांनी ट्विटर हा व्हिडीओ टाकला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने सुवर्णपदकांची कमाई केली आहे आता पुढील पिढी आकार घेत आहे. हा व्हिडीओ आपल्याला जलद मार्गावर घेऊन जाईल, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

हे ही वाचा:

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

ऐका, राऊतप्रकरणी पवारांच्या मौनाचे कारण…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली आहेत. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कास्य पदकांची भारताने कमाई केली आहे. कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधून भारताला सर्वाधिक पदके मिळाली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली आहेत. तर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताने सात पदके पटकावली आहेत. त्याशिवाय बॅडमिंटनमध्ये तीन पदके भारताने पटकावली आहेत.

Exit mobile version