एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याचे शुक्रवार, ९ जुलै रोजी सांगितले. ट्विटरकडून बनावट खात्यांची योग्य माहिती देण्यात येत नसल्याचे कारण एलन मस्क यांनी दिले आणि ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला. यावर भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एलन मस्क यांना खोचक टोला लगावला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “जर एलन मस्क हे भारतातील ट्रेनमधून प्रवास करत असले असते, तर कंडक्टरने त्यांना ‘TT’ म्हणजेच तिकिट नसलेला प्रवासी असे नाव दिले असते. पण आता लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टीटीचा वापर कोणत्याही बातमीच्या मथळ्यातही केला जाऊ शकतो.”

हे ही वाचा:

गौतम अदानींची होणार टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री?

राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट

श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा; आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघेंचं खासगी घर पेटवले

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा; राज्याच्या अडचणी दूर होऊन विकासासाठी साकडं

एलन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटरच्या खरेदीची घोषणा केली होती. ४४ अब्ज डॉलर्सचा करार निश्चितही झाला होता. मात्र, काल एलन मस्क यांनी हा करार रद्द केल्याची माहिती समोर आली. ट्विटरकडून ट्विटरच्या बनावट खात्यांच्या संख्येबद्दल अपूर्ण आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे करार रद्द करण्यात आला. दुसरीकडे ट्विटर हा करार लागू करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहे.

Exit mobile version