26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषदिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

Google News Follow

Related

उद्योगपती आनंद महिंद्रा हे समाज माध्यमांवर सक्रीय असतात. समाज माध्य्मांवरून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवर त्यांची नजर असते त्यानंतर ते अनेकदा लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत असतात. असाच एक व्हायरल व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग व्यक्ती मॉडिफाईड रिक्षा चालवताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांना हा  व्हिडीओ पासून त्या व्यक्तीचे खूप कौतुक वाटले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, “हा व्हिडीओ अचानक नजरेत आला. हा व्हिडीओ किती जुना आहे, कधीचा आहे माहीत नाही. पण, हा व्हिडीओ पाहून आपण अवाक झालो आहोत, असे आनंद महिंद्रा म्हणाले. हे गृहस्थ शारीरिक आव्हानांना तोंड देत आहेत, परंतु निसर्गाने त्यांना जे काही दिले आहे त्याबद्दल ते आनंदी आणि कृतज्ञ आहेत,” असे आनंद महिंद्रा म्हणाले. आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीला नोकरीची ऑफर दिली आहे. तसेच या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी लोकांना मदतीचे आवाहन दिले आहे.

हे ही वाचा:

रायगड: महिला सरपंचाचा खून! विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव

कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून

काही मिनिटांचा हा व्हिडीओ सर्वांना अत्यंत प्रेरित आणि प्रोत्साहित करणारा आहे. व्हिडीओमध्ये हात आणि पाय नसलेला हा दिव्यांग माणूस आपली मॉडिफाईड रिक्षा मोठ्या आत्मविश्वासाने रस्त्यावर चालवत आहे. तसेच घरी दोन मुले, बायको आणि म्हातारे आई- वडील असून त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, असे ही व्यक्ती सांगताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोणकर यांनी कल्पकतेने बनवलेल्या गाडीचे कौतुक केले होते. ही कलात्मकता आनंद महिंद्रा यांना प्रचंड आवडली होती आणि त्यांनी लोणकर यांचे कौतुक करून त्यांना नवी कोरी गाडी देतो पण, तुमची गाडी मला द्या असे म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा