ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न

ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न

महिंद्रा अँड महिंद्रा या समुहाचाच एक हिस्सा असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स या कंपनीने ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’ या नव्या प्रकल्पाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या सहाय्याने गरजूंपर्यंत वेळेत ऑक्सिजन पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

या कंपनीने महाराष्ट्रातील विविध शहरांत हा प्रकल्प चालू केला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर या शहरांत ही सुविधा प्रामुख्याने सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने हा प्रकल्प हळूहळू देशाच्या इतर शहरांत देखील वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी, शिवसेनेला दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय!

निवडणुक आयोग विजय मिरवणुकांवर नाराज

भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्वीटरवरून यांची घोषणा केली आहे. ते म्हणतात की, आत्ता ऑक्सिजनचे उत्पादन हा मुख्य चिंतेचा विषय नसून त्याचे उत्पादनाच्या स्थानापासून ते रुग्णालये आणि घरांपर्यंतचे परिवहन हा आहे. आम्ही ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’ या माध्यमातून ही पोकळी भरून काढायचा प्रयत्न करणार आहोत.

त्या सोबत महिंद्रांनी विविध ठिकाणचे फोटो सुद्धा दिले आहेत. त्याशिवाय अगदी अल्पावधीतच ५०-७० बोलेरो पिकअप गाड्या रस्त्यावर या कामासाठी उतरवल्या जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. भारताला त्यासाठी परदेशी मित्रांचे सहाय्य लाभले आहेच, परंतु त्यासोबत देशातल्या अनेक नामवंत उद्योगपतींनी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात द्रवरूप ऑक्सिजनच्या निर्मितीला देखील प्रारंभ केला आहे. त्याशिवाय भारताने लसीकरण मोहिम देखील तीव्र करायला सुरूवात केली आहे.

Exit mobile version