उद्योगपती आणि महिंद्र उद्योगसमुहाचे प्रमुख आनंद महिंद्र हे नेहमीच वेगवेगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देताना दिसतात. नवे काही कुणी उत्पादन केले असेल, कल्पनाशक्तीचा वापर केला असेल, भन्नाट आयडिया वापरली असेल तर महिंद्रा त्याचे आवर्जून कौतुक करतात आणि त्याला मदतही करतात.
पण ७ ऑगस्टला त्यांनी एक वेगळे ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक ओरँगउटॅन जातीचे माकड वाघाच्या पिल्लांना खेळवत असतानाचा व्हीडिओ त्यांनी शेअर केला आहे. सर्वसाधारणपणे वाघाची पिल्ले ही आपल्या आईसोबत खेळताना, बागडतानाचे व्हीडिओ आपण पाहतो किंवा माणूस, कुत्र्यांसोबत खेळतानाचे व्हीडिओदेखील आपण पाहतो. या भल्यामोठ्या माकडासह ही वाघाची पिल्ले अगदी मजेत खेळत असल्याचा व्हीडिओ महिंद्रा यांना भावला आणि त्यांनी तो शेअर करत म्हटले आहे की, कधी कधी वेगळ्या जातीच्या प्राण्यांची पिल्लेही तुम्हाला आवडतात. ती अगदी तुमचीच असल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी वर्तन करता.
हे ही वाचा:
१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार
केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग
तयार झाला मानवी वाहतूक करणारा देशातला पहिला ड्रोन
त्या व्हीडिओत हे माकड वाघाच्या चार-पाच पिल्लांमध्ये रमले आहे. एका वाघाच्या पिल्लाला ते बाटलीने दूध पाजते आहे. तर एका पिल्लाला डोक्यावरून पाठीवर ठेवत त्याच्याशी खेळते आहे. जणू काही आपले पिल्लूच असल्याप्रमाणे त्याला मिठी मारून त्याचे चुंबनही घेते आहे. वाघाची पिल्लेही हे माकड दुसऱ्या जातीचा कुठला प्राणी आहे किंवा नाही हे न पाहताच माकडासह अगदी मजेत आहेत. ही वाघाची पिल्लेही त्या माकडाच्या कुशीत शिरून स्वतःला सुरक्षित मानत आहेत.
Sometimes you feel like your kids belong to a different species but you’re crazy about them nevertheless! 😊 pic.twitter.com/rD9IGohPQq
— anand mahindra (@anandmahindra) August 7, 2022
आनंद महिंद्र हे अशा आगळयावेगळ्या व्हीडिओ शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मागे एका गरीब माणसाने तयार केलेल्या जीपचे कौतुक त्यांनी केले होते. असे वेगळे प्रयोग करणाऱ्यांचे कौतुक करून त्यांना आवश्यक असेल तर मदत करण्याचीही ते तयारी दर्शवतात. देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी ते उभे राहिल्याचे नेहमी दिसते.