‘लस ऑलिम्पिक’ असते तर भारताने सुवर्ण पदक पटकावले असते.

‘लस ऑलिम्पिक’ असते तर भारताने सुवर्ण पदक पटकावले असते.

‘लसीकरणाचे जर ऑलिम्पिक असते तर भारताने त्यात विश्वविक्रम रचून सुवर्णपदक पटकावले असते’ अशा भावना प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केल्या आहेत. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या विक्रमी लसीकरणाच्या अनुषंगाने महिंद्रा यांनी भारताच्या या कामगिरीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या अनोख्या शैलीत केलेल्या ट्विटसमुळे अनेकदा ते चर्चेतही असतात. तर क्रिकेट पासून ते राजकारणापर्यंत अनेक बाबतीत ते आपली मते ठामपणे व्यक्त करताना दिसतात. भारताने केलेल्या कोणत्याही ऐतिहासिक कामगिरीचे महिंद्रा यांना कायमच कौतुक असते आणि ते खुल्या दिलाने आपल्या भावना व्यक्त करतानाही दिसतात.

हे ही वाचा:

…म्हणून अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

ठाण्यात लसीकरण मोहिमेत होताय पक्षबाजीचे राजकारण

लसीकरणात भारताची ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे

महिंद्रा यांच्या याच स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा १७ सप्टेंबर रोजी आली. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारताने लसीकरणाच्या बाबतीत जागतिक विक्रम नोंदवला. एका दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त नागरिकांना लसवंत करण्याची कामगिरी भारताने केली आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेत नोंदवला गेलेला हा अनोखा विक्रम सर्वांनाच अभिमानास्पद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवशी ही अनोखी भेट आपल्या देशाकडून देण्यात आली आहे.

भारताच्या याच कामगिरीचे महिंद्रा यांनी भरभरून कौतुक केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “काही काळापूर्वी, आमच्या लक्षात आले की आपण दर तीन दिवसांनी एका ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीचे लसीकरण करत आहोत. तर काल, आम्ही एका दिवसात एका ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीचे लसीकरण केले. जर ‘लस ऑलिम्पिक’ असते तर आपण नवीन विश्वविक्रम रचत सुवर्ण पदक पटकावले असते.” असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version