माकडांना घाबरवणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुलीला आनंद महिंद्रा यांनी दिला नोकरीचा प्रस्ताव

अलेक्साचा वापर करून माकडांचा हल्ला परतवला;

माकडांना घाबरवणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुलीला आनंद महिंद्रा यांनी दिला नोकरीचा प्रस्ताव

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील १३ वर्षीय निकिताने माकडांचा हल्ला परतवून लावण्यासाठी अलेक्साचा वापर करून प्रसंगावधान दाखवल्यामुळे ती एका दिवसात लोकप्रिय झाली आहे. इतकेच नव्हे तर तिला शिक्षण पूर्ण झाल्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नोकरीचाही प्रस्ताव दिला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर निकिताच्या प्रसंगावधनतेचे कौतुक केले असून शिक्षण पूर्ण झाल्यावर तिची कॉर्पोरेटमध्ये नोकरी करण्याची इच्छा असल्यास तिला नोकरीचा प्रस्तावही दिला आहे. ‘आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होणार की त्यावर अधिपत्य गाजवणार, हा आपल्या काळातील प्रमुख प्रश्न आहे. मात्र तंत्रज्ञान मानवी कल्पकतेला नेहमीच सक्षम करते, असाच दिलासा या तरुणीच्या गोष्टीतून मिळतो. तिने दाखवलेले प्रसंगावधान विलक्षण होते,’ असे कौतुक आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर केले.

‘सध्याच्या अनपेक्षित अशा या जगात तिने जे दाखवले ते नेतृत्वाचे कस दाखवणारे होते. तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यावर जर, तिला कॉर्पोरेटमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर महिंद्रा कंपनी तिला आपल्यात सामावून घेण्यास उत्सुक असेल,’ असे महिंद्रा यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा:

केरळ: निधीची मागणी करत ‘बादल्या’ घेऊन रस्त्यावर उतरली ‘काँग्रेस’!

काँग्रेसचा जाहीरनामा पाक निवडणुकीसाठी अधिक अनुकूल!

जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचे मराठी कलाकारांकडून कौतुक!

निकिताच्या घरात माकडे घुसल्यावर तिने अलेक्साचा वापर करून तिचा व तिच्या भाचीचा जीव वाचवला. ही घटना बस्तीमधील आवास विकास कॉलनीतील पंकाज ओझा यांच्या घरात घडली. त्यांची मुलगी निकिता सव्वा वर्षांच्या भाचीसोबत घरात खेळत होती. तेव्हा तिथे अन्य कोणीही नव्हते. अशा वेळी काही माकडांनी त्यांच्या घरात घुसून अन्नाच्या शोधात भांडी उचलण्यास सुरुवात केली. माकडे जेव्हा तिच्या दिशेने येऊ लागली, तेव्हा निकिता घाबरली खरी, मात्र तेवढ्यात तिचे लक्ष फ्रिजवर ठेवलेल्या अलेक्सावर गेले. तिने लगेचच अलेक्साला भुंकण्याचा आवाज ऐकवण्याच्या सूचना केल्या. जेव्हा या यंत्राने भुंकण्याचा आवाज ऐकवला तेव्हा ही माकडे घाबरली आणि बाल्कनीतून पळून गेली.

‘आमच्या घरी काही पाहुणे आले होते. मात्र जाताना ते दरवाजा उघडेच ठेवून गेले. त्यानंतर माकडांनी स्वयंपाकघरात घुसून भांडी इतस्ततः फेकण्यास सुरुवात केली. हे पाहून लहान मूल घाबरले आणि मीही. त्यानंतर माझे लक्ष अलेक्साकडे गेले. मी तिला कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले. भुंकण्याचा आवाज ऐकून माकडे घाबरली आणि पळून गेली,’ असे निकिता सांगते. या व्हर्च्युअल असिस्टंट तंत्रज्ञानामुळे १३ वर्षांच्या मुलीने स्वतःसह या सव्वा वर्षाच्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.

Exit mobile version