वडिलांच्या निधनानंतर एग रोल विकणाऱ्या जसप्रीतला महिंद्रांचा हात

जसप्रीतवर आली कुटुंबाची जबाबदारी

वडिलांच्या निधनानंतर एग रोल विकणाऱ्या जसप्रीतला महिंद्रांचा हात

वडिलांच्या निधनानंतर उपजीविकेसाठी एग रोलची विक्री करणाऱ्या जसप्रीत सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या मुलाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महिंद्र उद्योग समुहाचे प्रमुख आनंद महिंद्र हे नेहमीच अशाबाबतीत जागरुक असतात. असे व्हीडिओ दिसल्यानंतर त्यांची दखल घेऊन मदत करणे किंवा त्याला मदत मिळवून देणे, त्या व्यक्तीचे कौतुक करणे यात महिंद्र आघाडीवर असतात.

सोशल मीडियावर जसप्रीतचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. एक आठवड्यापूर्वी फूड व्लॉगर सरबजीत सिंग यांनी त्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर १० वर्षीय जसप्रीतने आपला १९ वर्षीय चुलत भाऊ गुरमुख सिंग याच्यासोबत जेवणाची गाडी चालवण्याची जबाबदारी कशी उचलली, हे दाखवण्यात आले आहे.

जसप्रीत हा दिल्लीतील टिळक नगरमध्ये एग रोल बनवून विकतो. वडिलांच्या निधनानंतर जसप्रीतची आई दिल्लीमध्ये राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्याची आई मुलीला घेऊन पंजाबला गेली आणि घराची संपूर्ण जबाबदारी जसप्रीतवर आली.
त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही तो शेअर केला.

हे ही वाचा:

‘निलेश मेहता’ बनला ‘बिजल मेहता’, लिंग शस्त्रक्रियेनंतर महिला म्हणून कामावर रुजू!

मी यापूर्वी कधी बोललो नाही, पण मुस्लिम समाजाने आता आत्मपरिक्षण करायला हवे!

ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स

“राहुल गांधींना राम मंदिराचा निकाल उलथवायचा होता”

‘या हिम्मतवान मुलाचे नाव जसप्रीत आहे. मात्र त्याच्या शिक्षणावर याचा परिणाम होता कामा नये. मला वाटते, तो दिल्लीच्या टिळक नगरमध्ये आहे. जर कोणाला त्याचा संपर्क क्रमांक किंवा अन्य माध्यम असले तर कोणीतरी मला ते द्यावे. त्याला कशा प्रकारे शैक्षणिक मदत करता येईल, हे आमची महिंद्रा फाऊंडेशनची टीम बघेल,’ असे ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

Exit mobile version